Pyaavs_and_Paanpois_banner
Final-map-Pune-confluence2_IC_Fountains-2_1
story
09
/11

प्याऊ आणि पाणपोई

पुण्यातील पाणी वितरणाच्या प्रकारांची काही क्षणचित्रे
द्वारा - स्वप्ना जोशी & तन्वी कानीम
धार्मिकतेची कृती; परोपकारिता; विश्रांती घेण्याची आणि विचारांचे आदानप्रदान करण्याची जागा; तहान शमवण्यासाठी जागा; सर्वांना पिण्याचे पाणी देण्याची संकल्पना; हे सर्व विचार आणि आचार सार्वजनिक पेयजल वितरणाच्या ठिकाणी एकत्र येतात. पुण्यातील पाणी वितरणाचे प्रकार, ऐतिहासिक प्याऊ (पूर्वीच्या काळात बांधलेले पिण्याच्या पाण्याचे कारंजे) आणि आधुनिक पाणपोई (विनामूल्य पिण्याचे पाणी युनिट) या दोन अभिव्यक्तींची ही कथा आहे.

परिचय

अशी कल्पना करा की तुम्ही एका व्यस्त रस्त्यावरून, दुपारच्या कडक उन्हात चालत आहात आणि तुम्हाला तहान शमवण्यासाठी पाण्याची नितांत गरज आहे. तुम्हीच्या जवळ पाण्याची बाटली नसेल तर, तात्काळ उपाय म्हणजे पाण्याची बाटली विकत घेणे. यावर आणखी एक उपाय म्हणजे “वॉटर एटीएम: एक स्वयंचलित पाणी वितरण केंद्र”; जे भारतीय शहरांमध्ये नवीन आहे, परंतु वेगाने रुजत आहे. तथापि, पाणी मिळविण्यासाठी अधिक पारंपारिक आणि शाश्वत दृष्टिकोन कोणता असू शकतो हा प्रश्न आहे. पिण्यायोग्य पाणी मिळवण्यासाठी वापरल्या जाणार्‍या विविध प्रकारच्या विहिरी, बंधारे आणि पाईप लाईन या व्यवस्था आपल्याला माहित आहेतच. परंतु आपल्या स्वतःच्या हाताने पिण्याचे पाणी घेता येणाऱ्या प्रकारांबद्दल आपल्याला कमी माहिती आहे. अशा पाणी वितरणाचे दोन कमी ज्ञात पण महत्त्वाचे प्रकार असलेल्या पुणे Cantonment मधील ‘प्याऊ’ आणि ‘पाणपोई’ यांची ही गोष्ट आहे.

निकामी झालेले जुने पिण्याच्या पाण्याचे कारंजे (L). आधुनिक वापरात असलेले पिण्याच्या पाण्याचे वितरण केंद्र (R).

रस्त्यांच्या कडेचे जलस्रोत

ऐतिहासिक पिण्याच्या पाण्याची कारंजी स्थानिक पातळीवर प्याऊ म्हणून ओळखली जातात तर आधुनिक पाणी वितरण केंद्रांना सामान्यतः पाणपोई म्हणतात. परंतु ही नावे बरेचदा एकमेकांच्या ऐवजी वापरली जातात. पुणे कॅन्टोन्मेंटमधील ईस्ट स्ट्रीट, एमजी रोड, सोलापूर रोड, बुटी स्ट्रीट या आसपासच्या परिसरात दोन ऐतिहासिक आणि सहा नवीन पाणी वितरण केंद्र आहेत. प्रत्येक संरचनेचा एक विशिष्ट पैलू आहे आणि प्रत्येक परिसराची एक अनोखी कथा आहे.

Courtesy – Google Map data 2022, acquired on 15-02-22. (Source)

पिण्याच्या पाण्याच्या केंद्रांचे महत्त्वाचे पैलू

पुण्यातील 20 व्या शतकातील पिण्याच्या पाण्याचे कारंजे

१. पिण्याच्या पाण्याचे कारंजे: प्याऊ

पुण्यात वसाहत काळातील अशी फक्त दोन-तीन प्याऊ (पिण्याच्या पाण्याची कारंजी) आहेत ज्यांना मृत आत्म्यांच्या स्मरणार्थ संरक्षण दिले जात होते. यातील दोन संरचना आज अस्तित्वात आहेत, मात्र त्या अकार्यक्षम आहेत. प्याऊ हे विसाव्या शतकात अनेक भारतीय शहरांमध्ये रुजलेल्या परोपकाराच्या वारशाचे दाखले आहेत.

सोलापूर बाजार पोलीस ठाण्याजवळील श्री. विवेक यादव यांच्या देणगीतून उभारलेली पाणपोई

२. पिण्याच्या पाण्याचे केंद्र: पाणपोई

प्याऊ प्रमाणेच पिण्याचे पाणी पुरवण्याच्या हेतूने पाणपोई बसवण्याची प्रथा अस्तित्वात आहे. सामाजिक पाठिंब्यातून निर्माण झालेली अशी पिण्याच्या पाण्याचे वितरण करणारी केंद्र रस्त्यावर पिण्याच्या पाण्याच्या एक चांगला स्रोत आहेत. पाणपोई हे अत्यंत साधे परंतु खूप उपयुक्त साधन आहे.

आंबेडकर रोड येथील पिण्याच्या पाण्याच्या कारंज्यावरील माहिती फलक

३. लोक, परोपकार, आठवणी आणि पाणी

पाणी वितरणच्या या दोन प्रकारांना जोडणारा समान धागा म्हणजे परोपकाराची कृती आणि पिण्यायोग्य पाण्याची तरतूद. मृत आत्म्याच्या स्मृतींचे जतन करणे आणि सामाजिक बांधिलकी जपणे हे सर्व जुन्या-नव्या पाणी वितरण केंद्रांची आणखी एक वैशिष्ट्य आहे.

भूतकाळ विरुद्ध वर्तमान

अनेक शतकांच्या अंतराने, पुणे कॅन्टोन्मेंटमधील आंबेडकर चौकाने (किंवा कॅम्प भागात) प्याऊ आणि पाणपोई हे दोन्ही पाहिले आहेत.

प्याऊ

1910 पासून प्याऊ एकेकाळच्या प्रसिद्ध नेपियर हॉटेलच्या बाहेर स्वर्गीय दोराबजी दादाभॉय बुटी यांच्या स्मृतींप्रीत्यर्थ वसलेले आहे. दिवंगत दादाभॉय बूटी हे 20 व्या शतकाच्या पूर्वार्धात शहर प्रशासनातील तसेच पुणे शहराच्या सामाजिक जीवनातील एक प्रमुख व्यक्तिमत्व होते. ते नगरपालिकेचे Vice-President व नेपियर हॉटेलचे मालक होते.

पिण्याच्या पाण्याचे कारंजे मूळतः कसे दिसत असावे याचे अनुमानित उदाहरण
अरोरा टॉवर्स समोरील मोडकळीस आलेला बुटी प्याव.

बुटी प्याऊ रस्त्याच्या एका कोपऱ्यात अस्वच्छ अवस्थेत पडून आहे. संगमरवरी आणि काळ्या कातळापासून बनवलेल्या यात लोकांना पाणी पिण्यासाठी कुंड आणि पाण्याचा नळ आहे. एकेकाळी ईस्ट स्ट्रीटवरून जाणार्‍या प्रत्येकासाठी ते पाण्याचा स्रोत असले पाहिजे. संरचनेच्या खालच्या अर्ध्या भागावर कोरीव अक्षरे आहेत. lettering.

नळातून बाहेर येणारे पाणी गोळा करणारे कुंड
संरचनेच्या खालच्या अर्ध्या भागावर पट्टिका.

कोनाडा आणि मखर ज्यामध्ये स्वर्गीय श्री बुटी यांचा पुतळा किंवा इतर काही शिल्पकला असू शकते.

पाणपोई

जे ऑटो-रिक्षा चालक आपल्या वाहनांच्या रांगेत उभे असतील किंवा ज्या प्रवाशांना तहान लागली असेल त्यांना मोफत पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे हा या पाणपोई उभारणीमागचा उद्देश आहे. या पाणपोई संरचनेमध्ये दोन मातीची भांडी असतात जी वापरणारे लोक पाण्याने भरतात. ही मातीची भांडी कडक उन्हाळ्यातदेखील पाणी थंड ठेवतात.

शहरीकरणात हरवलेले…

२० व्या शतकाच्या सुरुवातीला बांधलेला हा प्याऊ कालांतराने मोडकळीस आला. आजूबाजूच्या जमिनीची पातळी इतकी वाढली आहे की त्याने संरचनेचा पाया व्यापून टाकला आहे. राणी लक्ष्मीबाई उद्यानाच्या बाहेर एका अरुंद गल्लीच्या कोपऱ्यात असणारा हा प्याऊ स्थानिक लोक, उद्यानात येणारे पर्यटक आणि इतर प्रवाशांची तहान भागवणारा असला पाहिजे. मात्र, आज त्याला पाणीपुरवठा करणारी पाईप जोडणी निकामी झाल्यामुळे प्याऊ निरुपयोगी झाला आहे. विशेष म्हणजे, ज्या देणगीदाराने हा प्याऊ कॅन्टोन्मेंट मॅजिस्ट्रेट लेफ्टनंट कर्नल एच मिन्चीन यांच्या स्मरणार्थ दान केला त्याने या प्याऊच्या संरक्षक फलकावर ‘भारतीय समाज’ असे लिहिलेले आहे. मात्र आज या परिसरात राहणाऱ्या समाजाचा या जलवितरण व्यवस्थेशी काहीही संबंध नाही.

पिण्याच्या पाण्याचे कारंजे मूळतः कसे दिसत असावे याचे अनुमानित उदाहरण
माहिती फलक आणि प्याऊचे भंगलेले कुंड

गंमत म्हणजे, आता पाण्याच्या रिकाम्या बाटल्या आणि बादल्या रचून ठेवण्यासाठी त्याचा आधार म्हणून त्याचा वापर केला जात आहे. प्याऊ भोजनालये, कॉफी शॉप्स, चहाचे स्टॉल्स आणि स्ट्रीट फूड च्या दुकानांनी वेढलेले आहे. मात्र ही जुनी रचना शहरीकरणात हरवलेली आणि दुर्लक्षिलेली आहे. जरी हा प्याऊ अकार्यक्षम झाला असला तरी आजूबाजूला सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्थेची गरज कायम आहे. अशा प्याऊना पुनरुज्जीवित आणि कार्यान्वित करण्यासाठी नागरी संस्थांनी पावले उचलल्यास गमावलेला वारसा पुनर्संचयित करण्यात तसेच पाण्याचा बाटल्यांचा वापर कमी करण्यात काही प्रमाणात मदत होऊ शकते. नव्याने बांधलेल्या पाणपोईंप्रमाणे जुने प्यावे देखील तहान शमवणारे ठरू शकतात.

जलवितरण केंद्रांच्या नवीन कल्पना

पूर्वीपासून शहरातील रस्त्यांवरील पाणपोई संचामध्ये बहुतेकदा मातीची भांडी असल्याचे दिसते. तथापि, 2005 मध्ये ईस्ट स्ट्रीटजवळ बांधलेल्या सोलंकी प्याऊ सारख्या दगडी बांधकामांचीसुद्धा काही उदाहरणे आहेत, परंतु ती आता वापरात नाहीत.

इस्ट स्ट्रीटवरील आधुनिक वितरण केंद्र (आता बंद पडलेले) ज्याला ‘प्याव’ म्हणतात.

सोलंकी कुटुंबाच्या परोपकारी प्रयत्नांचे फलित म्हणून ते बांधण्यात आले. सोलापूर रस्त्यालगत असलेल्या सोलापूर बाजार पोलीस चौकीजवळ आणखी एक रंजक उदाहरण आहे, जिथे श्रीमती वासंतीबाई अंधाजी मुथा यांनी वॉटर कुलरच्या रूपात पानपोई दान केली आहे. ही देखील 2005 मध्ये बांधली गेली आणि आजही वापरात आहे. मृतांच्या स्मरणार्थ मोफत पिण्याचे पाणी देण्याची परंपरा नवीन स्वरूपातही सुरू आहे.

पाणपोयांची मांदियाळी

सोलापूर बाजार पोलीस चौकीला जोडणारा रस्ता पाणपोईंनी समृद्ध आहे.

सोलापूर रस्त्यावर पुलगेट बसस्थानकाजवळ अर्ध्या किलोमीटरच्या परिघात तीन पाणपोई आहेत. मुठा बंगल्याच्या बाहेर एक मातीच्या भांड्याची पानपोई आहे. पुणे कॅन्टोन्मेंटमधील रहिवासी श्री विवेक यादव हे नेपियर रोडवरील सोलापूर बाजार पोलिस चौकीच्या शेजारी असलेल्या पाणपोईचे देणगीदार आहेत.

मुठा व्हिला बाहेरील पाणपोई पुलगेट रिक्षा स्टँडच्या सदस्यांच्या संयुक्त प्रयत्नातून बांधण्यात आली आहे. या गटातील सदस्य मातीच्या भांड्यांची काळजी घेतात आणि त्याच्या शेजारी असलेल्या नळाचा वापर करून ही भांडी भरून ठेवतात. एका ऑटो-रिक्षा चालकाचे सांगितले की या स्टँडवर प्रवाशांची वाट पाहत असताना या पाणपोईमुळे त्यांना पिण्याचे पाणी बाटलीत भरून घेता येते.

हरवलेल्या खजिन्याच्या काही गोष्टी

रायफल रेंजवरील सैनिकांसाठी राणीच्या जयंती वर्षानिमित्त बांधण्यात आलेला एक प्रतिष्ठित प्याऊ (पिण्याच्या पाण्याचे कारंजे) सध्याच्या कॅन्टोन्मेंट परिसरात सापडत नाही. एक जुने रेखाटन कलात्मक कारंजे प्रदर्शित करते ज्यात सुंदर गॅबल छप्पर, दोन बाजूंना पाण्याची कुंड आणि पाण्याचे नळ म्हणून ‘गार्गॉयल्स’ आहेत. हे कदाचित शहरातील सर्वात उत्कृष्ट पिण्याच्या पाण्याचे कारंजे असावे. एका जुन्या वृत्तपत्राच्या कात्रणामध्ये असे लिहिले आहे की ते ड्यूक ऑफ कनॉटच्या आज्ञेवरून राणीच्या जयंतीच्या स्मरणार्थ उभारले गेले होते आणि स्थापत्य कार्यकारी अभियंता आणि सरकारी सर्वेक्षक जे. अडम्स यांनी त्याचा आराखडा तयार केला होता. या वरवरच्या माहितीच्या आधारे, हा प्याऊ १९व्या शतकाच्या मध्यात बांधला गेला असावा. पाण्याच्या वारशाचा हा तुकडा शोधणे आणि शहराच्या पाण्याच्या वारशांच्या वर्णनाशी जोडणे करणे आवश्यक आहे. पाण्याशी निगडित वास्तुकलेचा हा एक अद्वितीय नमुना आहे आणि पाण्यामुळे लोकांच्या होणाऱ्या भरभराटीचा साक्षीदार आहे.

‘ज्युबिली फाउंटन’ रेखाचित्र, तथापि, वास्तविक रचना अद्याप सापडलेली नाही.
सेंट मेरी चर्चजवळ एक आधुनिक मातीची पाणपोई जी वापरात नाही.

एकीकडे, ऐतिहासिक कारंजी निकामी आणि नजरेआड होत आहेत, तर दुसरीकडे, काही आधुनिक पाणपोई देखील दुर्लक्षित आहेत. सध्याच्या काळात ही परंपरा लुप्त होत चाललेली आहे. प्याऊ आणि पाणपोईची उपयुक्तता केवळ मान्य करून चालणार नाही तर सार्वजनिक पाणी वितरणाची ही व्यवस्था पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. हा पाण्याचा घटक शहराच्या रस्त्यांशी जोडला गेलेला आहे आणि प्रवाशांना थांबण्यासाठी आणि विश्रांती घेण्यासाठी जागा देणारा आहे. कवी यशवंत यांनी लिहिलेली एक मराठी कविता या कथेला साजेशी आहे.

“येही भाई येथ पाही, घातली ही पाणपोई… धर्म जात कोणती भेद ऐसा येथ नाही…”

या संदर्भात समजून येते की पाणपोई ही सर्वांना सोयीस्कर आहे. पाण्याच्या आधारे संबंध आणि एकोपा निर्माण करण्यासाठी ती सर्वांना आमंत्रित करते.

References

  • Chiplonkar, S.H (ed). July 1880. The Quarterly Journal of the Poona Sarvajanik Sabha. Volume 3. Number 1: 15-18.

  • Gazetteer of Bombay state district series Vol XX – Poona district, Printed at the government central press, 1954, dspace.gipe.ac.in, Accessed on 12.02.2022.