Punyache
Paani
Water flows through Pune and its environs as rain, rivers, streams, canals and aquifers. As Pune evolved from a hamlet, along the sacred confluence of the Mula and Mutha rivers, to one of the largest cities in Maharashtra, water has often been indiscriminately harnessed for growing domestic and productive use. Punyache Paani celebrates the waters of Pune which were once revered for their sweet taste and unique properties. The exhibition traces Pune’s water heritage from early systems for storing water such as Baravs or stepped ponds, to the nahars or aqueducts built by local rulers, the famed Peshwas in the 18th century, to the colonial and post-colonial construction of dams and pipelines and the introduction of sanitary systems and hygiene measures. Beyond utility and ritual many of the early water structures were often meritorious acts by wealthy merchants and philanthropists who valued access to water for all. However, over the years, increasing urbanisation, climate uncertainty and social inequality have reshaped many of our urban waterscapes and pose a risk to our ecology, environmental well-being and public health.
Punyaache Paani seeks to raise awareness on the inevitable question, “where does our water come from?” It is a collaborative effort with diverse partners from across this bustling city – architects, urban planners, water professionals, NGOs, artists, research scholars and academics. Using interactive and engaging content, we explore water from an interdisciplinary lens sensitive to the multiple challenges we face and the need to build a holistic and ethical water stewardship.
Co-curators – Chhavi Mathur & Sara Ahmed
पुण्याचे
पाणी
पुण्यात आणि परिसरात पाऊस, नद्या, ओढे, कालवे आणि दगड-मातीतून पाणी वाहते. मुळा-मुठेच्या संगमावरील एका छोट्याशा खेड्याचा हळूहळू महाराष्ट्रातील एक मोठे शहर होण्यापर्यंत विकास होत गेला आणि वैयक्तिक आणि उत्पादक कामांसाठी पाण्याचा बेछूट वापर केला गेला. एकेकाळी त्याच्या गोडी आणि गुणवत्तेसाठी नावाजले गेलेले हे पाणी, ‘पुण्याचे पाणी ‘ साजरे करत आहे. या प्रदर्शनात अगदी प्राचीन अशा पाणी साठवण्याच्या बारव, पायऱ्या असलेली तळी, १८ व्या शतकातील प्रसिद्ध स्थानिक राज्यकर्त्यांनी, पेशव्यांनी बांधलेल्या नहरी वगैरे पद्धतीपासून वसाहतवादातील आणि त्यानंतरच्या धरणे, पाईपलाईन, सांडपाणी आणि स्वास्थ्यरक्षक यंत्रणा अशा बांधकामापर्यंत असलेल्या पाण्याच्या वारशाचा आढावा घेतला गेला आहे. केवळ उपयोग या हेतूपेक्षाही पूर्वीच्या काळी जलदानाचे पुण्य मिळवण्यासाठी अनेक श्रीमंत व्यापारी आणि परोपकारी व्यक्तींनी पाण्याचे साठे बांधले. तथापि एवढ्या वर्षांनंतर वाढते शहरीकरण, हवामानातील अनिश्चितता आणि सामाजिक भेदभावांमुळे शहरी जलभागात अनेक बदल झाल्यामुळे परिसर, पर्यावरण कल्याण आणि सामाजिक स्वास्थ्य यांना धोका निर्माण झाला आहे.
पुण्याचे पाणीला एका महत्वाच्या प्रश्नाची जाणीव करून द्यायची आहे, ‘आपले पाणी येते कोठून?’ शहरातील वेगवेगळ्या कार्यक्षेत्रातील लोकांनी ‒ स्थापत्यविशारद, शहर नियोजक, जल व्यावसायिक, बिगर-सरकारी संस्था, कलाकार, संशोधक आणि अभ्यासक यांनी केलेला हा एकत्रित प्रयत्न आहे. संवादात्मक आणि रुचकर मजकूर वापरून आम्ही पाण्याचा प्रश्न विविध चष्म्यातून मांडून अधोरेखित करत आहोत जेणेकरून या दिशेने एक सर्वसमावेशक, मूल्याधिष्ठित आणि समग्र कृती करता येईल.