loni bhapkar barav with mandap_banner
Final-map-Pune-confluence_IC_Tranforming-waters_1
story
01
/11

पोढी ते पाईप्स

पुण्याच्या पाण्याचे परिवर्तन
द्वारा - छवि माथुर
सहकारी सल्लागार: मानस मराठे, साईली पाळंदे-दातार
पार्श्वसंगीत: जॉय मॉन्तेरो

“I, in rains that fall,
waters that travel through rocks,
flows that touch your feet.”

(छायाचित्र श्रेय : सायली पाळंदे-दातार)

पुणे आणि पुण्याच्या परिसरातून पाणी पाऊस, नद्या, नाले, कालवे आणि भूगर्भातील प्रवाह यांच्या रूपाने वाहते. एका खेडेगावापासून पुणे महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या शहरांपैकी एक म्हणून विकसित होत असताना, पिण्यासाठी, धुण्यासाठी, शेतीसाठी आणि इतर बऱ्याच कारणांसाठी पाण्याचा वापर केला गेला आहे. आपल्या मूर्त आणि अमूर्त वारशांमधून संरक्षक, राज्यकर्ते, सरकारे आणि तंत्रज्ञान यांनी अनेकदा या जलप्रवाहात, त्यांच्या स्वातंत्र्यात व मार्गांत परिवर्तन घडवले आहे.

मी स्वस्थ रहायचे का वहायचे
स्वच्छंदपणे का पाईपमधून
आजची गत काय असेल?

ताब्यात घेतलेले पाणी

मी उड्या मारत, धडपडत
टेकड्यांवर उसळलो
रोखला जाईपर्यंत.

ताब्यात घेतलेल्या पाण्याचा आवाज प्ले करा

पूर्व ऐतिहासिक
सुमारे इ.स.पू. २०० ते 500 इ.स.

पोढी

व्यापार आणि धर्म एकत्र नांदत असल्यामुळे कोकण आणि दख्खन यांमधल्या सह्याद्री पर्वतांतल्या बौद्ध व जैन मठांच्या आश्रयदात्यांनी मठांच्या निवासी भागांत (विहारांत) पिणे, स्नान, व धार्मिक विधींसाठी पृष्ठभाग व भूगर्भातील पाणी साठवण्याकरिता या खडकांत खोदलेल्या हौदांची सोय केली.

The Podhis
भाजे लेणी येथील ब्राह्मी शिलालेख (कोशिकीपुत्र विन्हूदाता यांच्याकडून कुंडाची धार्मिक भेट). (छायाचित्र श्रेय : सायली पाळंदे- दातार)
The Podhis
भाजे लेणी येथील पोढी. (छायाचित्र श्रेय : सायली पाळंदे/पलांडे – दातार)

सुमारे इ.स. ७५०

पाताळेश्वर गुहेतील पायऱ्यांची विहीर

Pataleshwar
डावीकडे: पाताळेश्वर गुहा मंदिरातील एक पायऱ्यांची विहीर, राष्ट्रकूटांनी उत्खनन केलेली पुण्यातील सर्वात प्राचीन गुहा. (स्रोत : जेम्स बर्जेस)

सुमारे इ.स.९०० ते इ.स.१४००

बारव

Baravs 1
लोणी भापकर येथील बारव. (छायाचित्र श्रेय : मानस मराठे)

बारव अथवा पायऱ्यांची तळी अथवा विहरी किल्ल्यांमध्ये किंवा गावांच्या बाहेर, अनेकदा मंदिरांच्या जवळ बांधली जात आणि त्यात पावसाचे पाणी व भूगर्भातील पाणी साठवले जात असे. सामूहिक मेळाव्यांची स्थळे आणि वाटसरू व यात्रेकरूंसाठी विश्रामाची जागा म्हणून यांचा वापर केला जायचा. भिंतीमधील कोनाड्यांमध्ये देवतांच्या मूर्ती असत आणि पाणी बरेचदा धार्मिक विधींसाठी वापरले जात असे.

Final map-Pune confluence_IC_Pasan lake small
Full Story
बारव्स
Barav 2
किल्ले चावंड, जुन्नर येथील बारव. (छायाचित्र श्रेय : सायली पाळंदे-दातार)

इ.स.११०० ते इ.स.१४००

टाक्या

टाक्या म्हणजे दगडांत खणलेल्या समन्वित पाणी साठवण्याच्या जागा, ज्या प्रथम चावंडसारख्या यादव काळातील किल्ल्यांमध्ये उत्खनात आढळल्या. शिवनेरी किल्ल्यामधील गंगा-जमुना टाक्यांना पाणी काढण्यासाठी एक बाहेरील कक्ष आहे, व एक आतील कक्ष आहे जो दगडी स्तराच्या गर्भात असतो जो पाणी गार आणि स्वच्छ ठेवतो.

किल्ले चावंड येथील टाक्या. (छायाचित्र श्रेय : सायली पाळंदे-दातार)
तुम्हांला माहित आहे का?

टाक्या या उपयोगप्रधान होत्या तसेच गाठीभेटींच्या जागा होत्या .

शिवनेरी किल्ल्यातील गंगा-जमुना टाक्या. (छायाचित्र श्रेय : मानस मराठे)

सुमारे इ.स. १४०० ते इ.स. १६००

शिक्षणाचे एक सांस्कृतिक केंद्र

(योगदान : सायली पाळंदे-दातार)

संत ज्ञानेश्वर यांचे समकालीन संत नामदेव(इ.स. १३वे-१४वे शतक) यांचे एक काव्य नागेंद्र तीर्थाचे वर्णन करते. नागेंद्र तीर्थ ही सोमवार पेठेमधल्या नागझरी ओढ्याच्या काठावरच्या नागेश्वर मंदिरातील एक पायऱ्यांची विहीर होती. दंतकथा सांगतात की नागेंद्र तीर्थाचे पाणी कुष्ठरोग व इतर त्वचारोगांचे निवारण करू शकत होते असा लोकांचा विश्वास होता.

कसबे पुणा हे मुख्यत्वे कुंभार, तांबट, लोहार इ. यांचे एक खेडे होते, आणि या काळात सांस्कृतिक देवाणघेवाण आणि संवर्धन यांची वाढ झाली. शेख इस्माउद्दीन, शेख सलाहुद्दीन, गोविंदे यांच्यासारखे संत व कर्नाटक क्षेत्रातील ब्राह्मण कुटुंबांनी पुण्यात स्थलांतर केले आणि त्यांच्या अध्यात्मिक आणि साहित्यिक प्रथा सोबत आणल्या. या शतकाच्या शेवटी सोमवार पेठ (पेठशहापूर) व शनिवार पेठ (पेठ मुर्तझाबाद) या पेठी कसबा पेठेच्या (मूळ वसाहतीच्या) नजीक स्थापन केल्या गेल्या.

इ.स. १६०० ते इ.स. १७००

सुलतानी आणि आस्मानी आपत्ती

१५९५ पर्यंत भोसले परिवाराला (मालोजी राजे) अहमदनगरच्या निजामाने कसबे पुण्यासह काही गावांची जहागीर बहाल केली होती. १७व्या शतकाच्या सुरुवातीस मराठ्यांच्या अस्थिर युतींमुळे कसबे पूना हे मराठे, मुघल, निजामशाही आणि आदिलशाही यांच्यातील सत्तासंघर्षाचे केंद्र बनले होते.

१६३० च्या सुमारास मुरार जगदेव (अदिलशाही) यांनी कसबे पुण्याचा लष्करी तळ उध्वस्त केला आणि ‘गाढवाचे नांगर फिरवून’ जमिनीवर लागवड वा रहिवास करण्यास बंदी घातली. गाढवाचे नांगर फिरवणे हे जमिनीला लागवडीस व वास्तव्यास अयोग्य जाहीर करण्याचे प्रतीक होते. त्याच काळात पावसाळ्याचे चक्र बिघडले (?) आणि प्रदेशात बरेच दुष्काळ पडले आणि पूर आले. अशा “सुलतानी” आणि “आस्मानी” आपत्तींमुळे कसबे पुण्यातून मोठ्या प्रमाणावर लोक बाहेर पडले.

(योगदान : सायली पाळंदे-दातार)

१७व्या शतकाच्या नंतरच्या काळात दादा कोंडदेव आणि राणी जिजाबाई यांनी कसबे पुण्याच्या जमिनीच्या समृद्धीवरील जनतेचा विश्वास पुनःस्थापित केला. जसे-जसे लोक भागात परत येऊ लागले, तसे त्यांनी, पिण्यासाठी, स्नान करण्यासाठी व धुण्यासाठी भूगर्भातील पाणी साठवण्याकरिता विहिरी खोदल्या. अशा बऱ्याच विहिरी १९व्या शतकापर्यंत वापरात होत्या.

इ.स. १६०० ते इ.स. १७००

कूप

कसबे पूना येथील विहिरी दोन प्रकारच्या होत्या – आडचा व्यास साधारणपणे लहान असतो तर विहिर मोठा असतो आणि त्याला पायऱ्या असतात.

(स्रोत : Indian Jottings by Edward Elwin)

इ.स. १७०० ते इ.स. २०००

तलाव

सारसबाग आणि पर्वती तलाव. (स्रोत : Wikicommons)
04_pashan_lake
Full Story
रामनदी आणि पाषाण तलाव

पेशव्यांच्या काळात मनोरंजन, सौंदर्य व आपत्ती व्यवस्थापन यांसारख्या केवळ उपयुक्ततेच्या पलीकडील कारणांसाठी तलाव बांधले गेले. बाळाजी बाजीरावांनी १७५२ साली कसबा पेठेच्या पूर्वेकडच्या आंबील ओढ्याला पूर आल्यानंतर बांधलेला पर्वती तलाव पुण्याच्या पूर्वीच्या आपत्ती व्यवस्थापन उपायांपैकी एक आहे. या तलावात कमळे उमलत व नौकाविहार केला जाई. एक बेटासारखी बाग इथे बांधण्यातआली जिथे सवाई माधवराव पेशव्यांनी सारस पक्षी आणले, आणि यामुळे याचे नाव सारसबाग पडले. १९६८ साली पर्वती तलाव भरून त्याचे उद्यानात रूपांतर केले गेले.

ब्रिटिश काळात पाषाण तलावासारखे मानवनिर्मित तलाव पाषाण व सुतारवाडीसारख्या उपनगरांना पाणी पुरवण्यासाठी बांधण्यात आले. आज या तलावाचे पाणी जलपर्णीने आच्छादित केले आहे.

ब्रिटिशांनी बांधलेला पाषाण तलाव. (छायाचित्र श्रेय : अरुल एस. वसन)

आज

ताब्यात घेतलेले पाणी

आज अनेक जलाशयांचचे वारसास्थळे आणि/अथवा धार्मिक स्थळे म्हणून प्रलेखीकरण आणि संरक्षण करण्यासाठी विविध संघटना व नागरिकांची मंडळे प्रयत्न करतात. जे आज कार्यरत आहेत ते स्थानिकांची पाण्याची गरज पुरवण्यासाठी काम करतात.

लिंबराज महाराज, विठ्ठल मंदिर, बुधवार पेठ येथे कूप आहे. (छायाचित्र श्रेय : छवि माथुर)

या विहिरीतील पाणी नलिकेद्वारे (पाईपने) पंपिंग करून बाहेर काढले जाते आणि मंदिरासाठी वापरले जाते. (छायाचित्र श्रेय : छवि माथुर)

शतके उलटली तरी
माझा शांतपणा त्यांना खुणावतो
पाणी प्यायला, डुबकी मारायला,
विश्रांती घ्य्यायला किंवा प्रार्थना करायला.

वाहते पाणी

डोंगरांनी वेढलेल्या पुण्यातून अनेक नाले व नद्या वाहतात. यांच्या काठी इथे वसाहत रुजली पण आता या प्रवाहांचे भावितव्य आलेल्या आक्रमक सत्तांनी आणलेल्या तंत्रज्ञानाने हातात घेतले.

तुमचे हात देतात मला दिशा
माझ्या वाहण्यात तुमची सत्ता दिसते
माझे प्रवाह आता माझे नाहीत.

वाहत्या पाण्याचा आवाज प्ले करा

ख्रिस्तपूर्व ८००० ते ख्रिस्तपूर्व ३०००

प्रागैतिहासिक भटकंती

जसा पावसाळ्याचा जोर वाढत गेला, पुण्यातून वाहणारे पाणीही वाढले आणि नदीपात्रात अनेक वनस्पती व पशुपक्ष्यांची भरभराट झाली. प्राचीन काळातील साधने, सांस्कृतिक अवशेष आपल्याला अन्न अन् पाण्याच्या शोधात भटकणारे समुदाय कसे हंगामी प्रवाहाचा पाठलाग करायचे हे सांगतात.

02_tracing_lost_water_icon
Full Story
हरवलेल्या पाण्याचा मागोवा

ख्रिस्तपूर्व ३००० ते ख्रिस्तपूर्व ९००

कांस्यपाषाणयु-गातील वसाहती

शेतकऱ्यांच्या वस्त्या पूर पात्रात जिथे उन्हाळ्यातसुध्दा पाणी साठायचे, अशा नदीकिनारी, स्थायिक झाल्या. त्यांचा उदरनिर्वाह शेती, मासेमारी, शिकार आणि पशुसंवर्धनावर होत असे. घोडनदी शेजारच्या इनामगावात, नदी वळवण्याचे तंत्रज्ञान वापरले गेले.

इसवि सन 1100 ते 1300

पवित्र पाणी

मुळा आणि मुठा हंगामी नद्या आहेत आणि पावसाळ्यात या नद्यांना पूर यायचा. यादवांनी मुठा नदी किनारी अनेक घाट बांधले. ह्या नद्यांचा संघम पवित्र मानला गेला आहे

03_river_mula_mutha_icon
Full Story
मुळा मुठा नद्या
Scared Waters
(स्रोत : Wikicommons)

इसवि सन 1300 ते 1500

मध्ययुगीन वस्ती

नागझरी ओढ्याच्या (मुठा नदीला एक भरणारा प्रवाह) कडेला असलेल्या एका लहानशा वस्तीतून पुणं वाढू लागलं. यादवांकडून दख्खनच्या सल्तनतीकडे राज्य गेले आणि शेवटी १४व्या शतकात बहामन्यांचे राज पुण्याने पाहिले. आजच्या कसबा पेठेतल्या किल्ले हिस्सार (उर्फ जुना कोट किंवा जुनी भिंत) या मुळे पुण्याला लष्करी महत्त्व प्राप्त झाले. सध्याच्या कसबा पेठेत शस्त्रागार आणि बाजारपेठेला संरक्षण म्हणून किल्ले हिस्सार (जुना कोट/भिंत) बांधला गेला. घरे भिंतीच्या पलीकडे होती. मुठा नदीमुळे किल्ले हिस्सार आणि त्यातल्या लोकांना एक नैसर्गिक संरक्षण होते.

(इंटॅक पुणे विभाग यांच्या ‘क्वीन ऑफ द डेक्कन’ या पुस्तकावर प्रतिमा आधारित)

इसवि सन 1500 ते 1600

नहरी – मध्यपूर्वकालीन कनातीवर आधारित

बहामनी राज्य अनेक छोट्या राज्यांमध्ये विभागले गेले, त्यापैकी पुण्याभोवतीचे प्रदेश निजामशाही आणि आदिलशाहीच्या ताब्यात होते. निजामाने अहमदनगर, औरंगाबाद आणि जुन्नर सारख्या अनेक दख्खनी शहरांमध्ये फारशी ‘कनात’ व्यवस्थेचे जलवाहिनी (नहर) व्यवस्था तयार करण्यासाठी रूपांतर केले. ज्याने नंतर पुण्याच्या जलविकासावर परिणाम झाला. जलवाहिनीतले पाणी जमिनीखालच्या दगडी टाक्यांमधून वापरण्यात येत असे. त्याला “हौद” असे नाव पडले.

पिर्झदा वाड्याचे हौद जुन्नरच्या नहरीला जोडले गेले होते. (छायाचित्र श्रेय : मानस मराठे)

इसवि सन 1638

पुण्याचे पहिले धरण

“सेरी-पार्वतीचे धरण” किंवा “बेल धरण” हे आंबील ओढ्यावर दादोजी कोंडदेव यांनी सिंचनासाठी आणि पुण्याच्या पुनर्वसनासाठी मदत व्हावी म्हणून बांधले. आधुनिक धरणांप्रमाणे, यामुळे देखील स्थानिक वस्त्यांचे स्थलांतरण झाले.

(छायाचित्र श्रेय : छवि माथुर)

इसवि सन 1700 ते 1800

पुण्यातील नहर

१७२० मध्ये पुणे पेशव्यांची राजधानी झाले. त्यामुळे काही वर्षात रहिवाशी आणि प्रवासी यात्रेकरूंची लोकसंख्या वाढली, ज्यामुळे उपस्थित असलेल्या पाण्याच्या सुविधांवर ताण आला. पेशवे बाळाजीराव यांची आजी, राधाबाई यांनी त्यांना राज्यातील पाण्याची उपलब्धता सुधारण्यासाठी राजी केले. परिणामी, पुण्याचे पाहिले जलवाहिनी – “नहर-ए-कात्रज” १८व्या शतकाच्या मध्यात बांधण्यात आले. या जलवाहिनिने शनिवार वाड्यात (पेशवाई निवासस्थान) पाणी आणले आणि सार्वजनिक व खाजगी हौदांनाही पाणी पुरवले.

जसे पुण्याची पुढे वाढ झाली, पेठांची संख्या वाढली, तसतशा अधिक नहरव्यवस्था कार्यान्वित करण्यात आल्या. १८व्या शतकाच्या अखेरीस, पुण्यात चार जलवाहिनी व्यवस्था वापरात होत्या.

08_Peshwa _Aqueducts_icon
Full story
पेशवेकालीन जलवाहिनी

इसवि सन 1700 ते 1800

पुण्यातील कारंजे

शनिवारवाडा येथील हजारी कारंजे. (छायाचित्र श्रेय : मानस मराठे)
09_Pyaavs_and_Paanpois
Full Story
प्याऊ आणि पाणपोई

पाण्याचा दुष्काळ असलेल्या प्रदेशात मुबलकतेचे व सामर्थ्याचे प्रतीक या अर्थी सुशोभित कारंजे बांधता येऊ शकतात. शनिवारवाड्यातील हजारी कारंज्याला कात्रजच्या जलवाहिनीतून आणि विश्रामबागवाड्यातील कारंज्याला नाना फडणवीस जलवाहिनीतून पाणी पुरविले जात असे.

विश्रामबागवाडा येथील कारंजा. (छायाचित्र श्रेय : सायली पाळंदे-दातार)

इसवि सन 1700 आणि पुढे

पूल

पुण्याचे पाहिले पूल पेशव्यांनी बांधले. या पुलांमध्ये तेव्हापासून अनेक परिवर्तने झाली आहेत आणि नवीन पूलदेखील बांधण्यात आले आहेत.

10_crossing_of_river
Full Story
नदी ओलांडताना
होळकर पूल, १७७० मध्ये मुळा नदीवर बांधण्यात आला. (जॉन फ्रेडरिक लेस्टरचे चित्र, स्रोत : ब्रिटिश लायब्ररी)

आज

वाहते पाणी

जरी आपण नहर व्यवस्था बंद केल्या असल्या, नाले प्रदूषित केले असले, काही झाकलेले असले, तरी ही पुण्याचे वाहणारे पाणी इथल्या लोकांच्या सांस्कृतिक प्रथांना आणि उपजीविकेला आधार देत आहे.

06_river_of_life
Full Story
जीवनवाहिनी
मुळा नदीवरील चांदे-नांदे पुलाखालील मच्छीमार/कोळी. (छायाचित्र श्रेय : छवि माथुर)
प्रदूषित झालेली, मर्यादित प्रवाहातून वाहणारी मुठा नदी आपल्या जीवनमृत्यू चक्राचा भाग आहे. संगम पुलावरून दिसणारी मुठा नदी. (छायाचित्र श्रेय : छवि माथुर)
05_whisper_of_life
Full Story
विस्फर्स ऑफ रिव्हर

“लोकांसाठी सुबक पायवाटा
आगगाड्यांसाठी पूल
मेट्रोचे खांब जलद उभे राहता
तुम्ही बहुधा विसरता की जेव्हा तुम्ही बांधता
तुम्ही पार करता, मी तिथेच असतो.”

पाइपचे पाणी आणि लोकांचे आरोग्य

फार मोठ्या कालावधीसाठी पुण्यातील जलवाहिन्या आणि पाईपमधून जाणारे पाणी एकत्र राहिले. पाण्याच्या मुलभूत सुविधेचा विकास उपयोगप्रधान असून मुख्यत: ब्रिटिशांचा अभियांत्रिकी क्षेत्रातील पराक्रम आणि महत्वाकांक्षा दाखवण्याकरता असल्याने परपांरिक जलवहिनी पद्धत पडद्याआड गेली. यामुळेच पुण्यात पाईप आणि बोरवेल वर आधारीत जलवहिनी पद्धत विकसित झाली.

स्टीमशिपच्या वापराने जगतील पहिले व्यापाराचे जाळे तयार झाले ज्यामध्ये पुणेदेखील ओढले गेले. पुण्यासाठी जागतिकीकरण म्हणजे वस्तू, संस्कृती, ज्ञान आणि रोगांची जलद देवाणघेवाण अशा रूपात झाले. यामुळेच त्या काळात प्रत्येक साथीच्या रोगामध्ये पुणे बॉम्बे प्रशासनाच्या सर्वात बाधित भागांपैकी एक राहिलेला आहे. आज कोविड-19 च्या काळातदेखील ही प्रक्रिया अशीच सुरू आहे.

Travel straight lines
Hidden within your pipes
I lose my rights.

पाईपमधून वाहणाऱ्या पाण्याचा आवाज प्ले करा

इसवि सन 1817

पुणे छावणी

ईस्ट इंडिया कंपनीने पेशवा बाजीराव 2 विरुद्ध खडकीची लढाई जिंकल्यानंतर मुळा नदीकाठी किर्की छावणी आणि मुळा- मुठा नदीकाठी पुणे छावणी उभारली. पेशव्यांच्या प्रदेशात आता बॉम्बे प्रेसिडेन्सी चे प्रशासन व्यवस्था पाहत होते.

Kirkee
(स्त्रोत : Wikicommons)

इसवि सन 1817 ते 1857

ब्रिटिशांद्वारे पारंपारिक जल- प्रणालीची देखभाल

ब्रिटिश राजवटीच्या सुरुवातीच्या काळात जलवाहिन्या मुख्यत्त्वे पिण्याच्या पाण्यासाठी वापरल्या जात असत तर आंघोळीसाठी आणि धुण्यासाठी विहीरी, नद्या आणि ओढ्यांचा उपयोग केला जात असे. ब्रिटिशांनी बेलदार आणि मेहार यांसारख्या पारंपारिक समुदायांऐवजी येरवडा तुरुंगातील कैद्यांना जलवाहिनींची निगा राखायला ठेवले होते. अगदी किरकोळ कामांसाठीदेखील मुंबई प्रशासनाकडून परवानगी घेतल्याखेरीज कोणतेही काम करता येत नव्हते. त्यामुळे ही प्रक्रिया त्रासदायक होत असे.

लघुकथा

आजार, पाणी आणि स्वच्छता

Scroll right
इसवि सन 1826 ते 1837

पुण्यात कॉलराचे आगमन

सन १८२६ ते १८३७ दरम्यान पुण्यात कॉलरा महामारीची लाट आली. मायस्मा (हानिकारक/विषारी दुर्गंध), 'विशेष विष' आणि लैंगिक संबंध हे रोगसंक्रमणाचे संभाव्य मार्ग होते. कापड उत्पादक व समाजसुधारक असलेल्या रॉबर्ट ओवेन याने कॉलरा आणि लंडनमधील कारखान्यातील कामगारांना स्वच्छतेबाबत उपलब्ध असलेली घाणेरडी

परिस्थिती यांच्यातील प्राथमिक संबंध प्रस्थापित केला. सन १८३१ साली लंडनमध्ये आरोग्य मंडळाकडून दक्षतेची सूचना जारी करण्यात आली होती.

disease_water_1
(स्रोत: Wellcome collection)
इसवि सन 1842

चाडविकचा अहवाल, स्वच्छता आणि सौंदर्य

एडवर्ड चाडविक या 19 व्या शतकातील सामाजसुधरकाने सुरु केलेल्या स्वच्छता मोहिमेला अनेक आरोग्य कर्मचारी, लेखक आणि कलाकारांनी पाठिंबा दिला. ब्रिटिश वसाहतींमध्येही स्वच्छतेवर लक्ष केंद्रित केले गेले.

disease_water_2
(स्रोत: Amazon.in)
इसवि सन 1849

पटकी, धर्मस्थळ, आणि स्वच्छता

इंग्लड मध्ये जॉन स्नो आणि विलिअम बड यांनी पटकी हा पाण्यामुळे निर्माण होणारा आजार आहे हे सिद्ध केले. मूळ भारतीयांवर रुग्णालयांमध्ये दाखल होणे बंधनकारक नव्हते. वसाहती राजवटीने संशोधन करून हिंदू तीर्थक्षेत्रे आणि कॉलेरा यांचा संबंध प्रस्थापित केला आणि त्यानंतर पुणे व् इतर आसपासच्या तीर्थक्षेत्रांवर स्वच्छता मोहीमा राबवण्यात आल्या.

disease_water_3
(स्त्रोत : Wikicommons by Tony Hisgett)
इसवि सन 1854

हिवताप आणि डास

हिवतापाच्या (मलेरिया) व्यवस्थापनासाठी औषधाइतकेच महत्व सुधारित स्वच्छतेलाही दिले जात होते. पुणे लष्कर आणि आसपासच्या परिसरतील स्वच्छताविषयक स्थिती आणि मलेरियाचे कारण दूर करण्यासाठीच्या उपाययोजनांबाबत लष्करी आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मिश्र समितीचा अहवाल. (स्त्रोत: British Library IOR/P/351/37 20 Dec 1854 nos 6117-19)

disease_water_4
(स्रोत: Wikicommons, authored by Wellcome collection)
इसवि सन 1866

आंतरराष्ट्रीय
स्वच्छता परिषद आणि प्रवास विलिगिकरन

या परिषदेत आंतरराष्ट्रीय स्तरावर पाणी हे कॉलेराचे वाहक असल्याचे स्वीकारले गेले. अनेक देशांनी वेगवेगळ्या खंडातून इकडून तिकडे प्रवास करणाऱ्यांना संस्थात्मक विलगीकरण बंधनकारक करण्याचे ठरविले. स्वच्छताविषयक धोरणात हे महत्वाचे वळण होते. डावीकडे: परिषदेच्या अहवालाचे पहिले पान.

disease_water_5
(स्त्रोत: Harvard Library, ©2018 CC 4.0).
disease_water_6
उजवीकडे: विलगीकरण रक्षक जहाज (स्त्रोत: Wikicommons, authored by UK National Maritime Museum)

इसवि सन 1844 ते 1848

मुळा नदिवरील जमशेदजी जीजीभोय बांध

पुणे लष्करला पाणीपुरवठा करण्यासाठी पूरक म्हणून मुळा- मुठा नदीवर जमशेटजी जीजीभॉय या पारशी व्यापाऱ्याच्या आर्थिक मदतीने बंधारा बांधण्यात आला. या पाण्याचे शुद्धीकरण होऊन ते जलशयात पाठवले जायचे आणि तेथून लोखंडी पाईपच्या मदतीने लष्करातील टाक्यांपर्यंत पोहोचवले जायचे. जे. जे.

बांधाने‌ नदीला येणाऱ्या पुरालाही रोखले आणि तेव्हापासूनच पुण्यातील ‘रेगाटा’ नौका शर्यतींना सुरुवात झाली. या शर्यती आजही कॉलेज ऑफ इंजिनीरिंग, पुणे यांनी सुरू ठेवल्या आहेत.

(स्त्रोत : Wikicommons)
(स्त्रोत : Wikicommons)

इसवि सन 1850 ते 1859 जे. जे. बांध बंद झाला

पुण्यातील अतिरिक्त सांडपाणी मुळा नदीमद्ये सोडण्यात आल्यामुळे जे. जे. बांधाचा वापर पिण्याच्या पाण्यासाठी सोडून देण्यात आला. पुणे महनगरपालिकेच्या स्थापनेनंतर पाणीपुरवठा वाढवण्यासाठी फिलीप हार्ट यांच्या देखरेखीखाली पर्यायी स्त्रोतांचा शोध सुरु झाला.

(स्त्रोत : Digital Library India Archive)

इसवि सन 1858 ते 1870

रेल्वे आणि वाफेचे इंजिन

पुण्यामध्ये १८५८ मध्ये रेल्वे आल्या. १८६० च्या उत्तरार्धात बांधलेल्या भुशी धरणातून आजूबाजूच्या परिसरात वाफेच्या इंजिनासाठी लोखंडी पाईपद्वारे पाणीपुरवठा केला जात असे.

(स्त्रोत : Railway locomotive and Engineering, October 1907 edition)

इसवि सन 1865 ते 1877

खडकवासला धरन

१८६६ मध्ये जेम्स जॉर्ज फाईफ यांनी ब्रिटीश सरकारपुढे खडकवासला धरणाच्या बांधकामाचा प्रस्ताव मांडला. या प्रकल्पाचे काम १८६९ मध्ये सुरू झाले आणि १८७७ मध्ये पुण्याला पहिली जलवितरण यंत्रणा मिळाली. हे काम त्या काळात दख्खनच्या अंतर्गत केले गेलेले सर्वात आशादायक जलकाम मानले जात असे. फाईफ यांच्या नावावरून या कालव्याला नाव देण्यांत आले आणि मुठेच्या दोन्ही बाजूंना कालवे बांधण्यात आले. हे पाणी कालवे आणि पाईपद्व्यारे शहर, लष्कर व खेड्यांना पिण्यासाठी आणि वापरासाठी पुरवले जात होते. यामुळेच अनेक ठिकाणी लोकांनी विहिरींऐवजी कालव्यांचा वापर सुरू केला.

(स्त्रोत : Internet Archive)

इसवि सन 1876 ते 1879

पाणी घरापर्यंत पोहोचले

बॉम्बे नियम क्र. ७ नुसार ब्रिटिशांना लोककल्याणासाठी कोणत्याही प्रकारचे जलप्रकल्प बांधण्याचे आणि त्याची काळजी घेण्याचे अधिकार होते. त्याप्रमाणेच मुंबई प्रशासनतील सर्व प्रकारच्या नैसर्गिक जलशयांवर ब्रिटिशांचा अधिकार राहणार होता.

१८७६-१८७७ च्या दुष्काळात अनेक पाण्याच्या टाक्या कालव्याच्या जलसंवर्धनासाठी बांधण्यात आल्या.

पुण्यातील शेकडो घरांना प्रथमच या जलवहिन्यांचा लाभ मिळत होता.

इसवि सन 1880

लोखंडी भांडे आणि तांबेकाम करणारे कारागीर

अनेक तांबेकाम करणारे कारागीर नाशिक, अहमदनगर यासारख्या शहरांमधून पुण्याला स्थायिक होऊ लागले. आधी पाणी पिण्याकरीता, वाहून नेण्याकरिता, क्रियाकर्मांकरता शिसे आणि तांब्याच्या भांड्यांचा वापर केला जायचा. पण पुण्यात स्थानांतरित झाल्यावर कारागीर स्वस्त आणि कमी वैविध्य असलेले लोखंडी भांडे निर्माणा करण्याकडे वळले. तांबट आळी, कसबा पेठ.

तांबट आळी, कसबा पेठ. (स्त्रोत : Wikicommons, आर्या जोशी यांनी लिहिलेले)

लघुकथा

प्लेग आणि सार्वजनिक आरोग्य

Scroll right
इसवि सन 1896 ते 1897

प्लेग आणि महामारी कायदा

१८९६ मध्ये पुण्यात प्लेग चे 4500 रुग्ण आढळून आले. यामागचे संभाव्य कारण दूषित पाणी, दाटीवाटी आणि अस्वच्छ राहणीमान होते. प्लेगच्या भीतीने अनेक स्वच्छता कामगार मुंबई आणि पुणे सोडून निघून जात होते. यामुळेच ही शहरे राहण्यासाठी अयोग्य होत होती. 1897 मध्ये प्रथमच बॉम्बे पालिकेने महामारी कायदा अंमलात आणला.

या कायद्यामुळे लोकांचे फिरणे, धार्मिक कार्य करणे यावर बंधने आली होती. तसेच सराकारी अधिकाऱ्यांना लोकांच्या घरात जाऊन त्यांची पाहणी करणे, ते स्वच्छ करणे, आजारी लोकांना ताब्यात घेणे आणि विलगीकरणात ठेवणे असे किंवा अशा कोणत्याही प्रकारचे रोगप्रतिबंधक आदेश देता येत होते.

इसवि सन 1897

प्लेग आणि हत्या

पुण्यामध्ये माहामारी प्रतिबंधक कायद्याची अंमलबजावणी करणारे प्लेग प्रतिबंधक समितीचे अध्यक्ष वाल्टर चार्लस रँड होते. सक्तीने घेतलेल्या घरांच्या झडती, स्वच्छता, शैक्षणिक विलगीकरण, आजारी व्यक्तीच्या सामानाची जाळपोळ आणि ते नष्ट करणे यामुळे स्थानिक पुणेकरांच्या भावना दुखावल्या गेल्या. यातुनच पुढे चाफेकर बंधूंनी आजच्या गणेशखिंड रोडस्थित मेमोरियल स्टॅन्ड जवळ रँडची हत्या केली.

plague_1
(स्त्रोत: जेट्टी संशोधन संस्था)
plague_2
(छायाचित्र श्रेय: छवि माथूर)
इसवि सन 1897 ते 1907

प्लेग आणि लोकांचे आरोग्य

पुण्यातील प्लेगमुळे लोकांसाठी आरोग्यसेवा केंद्र उभारणे कोविड-१९ प्रमाणेच गरजेचे होते. त्यामुळेच त्या काळातील अधिकाऱ्यांनी एक मोठे प्लेग रुग्णालय आणि शैक्षणिक विलगीकरण केंद्रदेखील उभारले होते. हेन्रि नेविन्सन यांच्या प्रवासवर्णनानुसार १९०७ पर्यंत प्लेगमुळे पुण्यातील एक तृतीयांश लोक दगावले होते.

plague_3
सार्वजनिक प्लेग रुग्णालयातील ४० पैकी २३ वार्ड (स्त्रोत: जेट्टी संशोधन संस्था).
plague_4
प्रत्येक वॉर्डाबाहेर पिण्यासाठी, कपडे धुण्यासाठी आणि आंघोळीसाठी व्यवस्था करण्यांत आली होती (स्त्रोत: जेट्टी संशोधन संस्था).

इसवि सन 1899

नाल्याची व्यवस्था

घरकामातून निर्माण होणारी घाण ही पेशवाईत बांधण्यात आलेल्या दगडी नाल्यावाटे मुळा नदीत किंवा नाल्यावाटे रस्त्याशेजारील गटारांमध्ये सोडली जायची. ती वाहून नेण्यास स्वच्छ पाणी अपुऱ्या प्रमाणात असल्याने यांना डबक्यांचे स्वरूप आले.

रस्त्याशेजारी होणारी पाण्याची विल्हेवाट. (छायाचित्र श्रेय : छवि माथुर)

इसवि सन 1908 ते 1916

पाईपच्या पाण्याची प्रणाली

सर्वात पहिल्या पाईप च्या यंत्रणेने १०००००० पेक्षा जास्त लोकांना पाणीपुरवठा केला. सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी (पी. एच.) पुण्यातील जलस्त्रोतांची गुणवत्ता टिकवून ठेवण्यासाठी बारकाईने लक्ष ठेवून होते. कालवे आणि पाईपमधले पाणी गाळणे, रासयनिक प्रक्रिया करणे आणि दैनंदिन सर्वेक्षण करण्याचे काम पी. एच. प्रयोगशाळेचे होते. आता ही कामे महानगरपालिकेअंतर्गत येणाऱ्या सशस्त्र सेना वैद्यकीय महाविद्यालयाच्या पी. एच. विभागाद्वारे केली जातात.

(छायाचित्र श्रेय : नित्या शुक्ला)
(छायाचित्र श्रेय : छवि माथुर)

इसवि सन 1919

भारतातील पहिली धरणविरोधी मोहीम

मुळा नदीवरील मुळशी धरण आणि जलविद्युत केंद्र, पुण्यामध्ये पाणी आणि विजेचा पुरवठा करण्यासाठी बांधण्यात आले होते. यातुनच पुढे पांडूरंग महादेव बापट ( सेनापती)यांनी १९२० मध्ये मुळशी सत्याग्रह ही भारतातील पहिली धरणविरोधी मोहीम राबवली.

(स्त्रोत : Wikicommons)

इसवि सन 1919 ते 1940

नाल्याची व्यवस्था

१९१९ मध्ये शहर प्रशासनाने पुण्यामध्ये सांडपाणी निचरा करण्याची प्रणाली विकसित करण्यावर चर्चा सुरू केली. या प्रणालीमुळे पाण्याची गरज अधिक वाढणार होती. या प्रस्तावामुळे बॉम्बे सराकारसोबत वाद झाला. १९३०-१९४० च्या काळात सार्वजनिक गटारे, सांडपाणी विल्हेवाट लावण्याची प्रणाली कार्यन्वित झाले.

रंगजा, या पुण्यातील गटाने २०२० ,मध्ये अनेक सांडपाणी वाहून नेणारे चेंबर रंगवून त्यांना लोकांच्या नजरेत अधिक स्पष्ट केले. (छायाचित्र श्रेय : छवि माथुर)

इसवि सन 1952

पुण्यातील महत्वाच्या योजना आणि विषाणू संशोधन केंद्र

पुण्यातील महत्वाच्या योजनेमध्ये नळ विस्तार प्रणाली विकसित करण्यावर भर देण्यात आला. रॉक फेलर या विषाणू संशोधन संस्थेने मच्छरांमुळे पसरणाऱ्या विषाणूजन्य रोगांवर संशोधनासाठी एक केंद्र उभारले. (सध्याचे राष्ट्रीय विषाणुशास्त्र संस्था).

डेंगूच्या विषाणूचा इलेक्ट्रॉन सुक्ष्मग्राफ. (स्त्रोत : Wikicommons, authored by CDC)

इसवि सन 1957 ते 1980

पुण्यातील धरणं

खडकवासला जलाशयासाठी साठवण जलाशय म्हणून पानशेत धरण आणि वारसगाव धरण बांधण्यात आले. पर्वती जल केंद्र येथे पाणी गाळले आणि शुद्ध केले जायचे. वाढत्या औद्योगिक आणि माहिती तंत्रज्ञान केंद्रांची मागणी पूर्ण करण्यासाठी पवना जलशयाची निर्मिती करण्यात आली. १९६१ मध्ये पानशेत धरण फुटल्यामुळे आलेला पूर पुण्यातील सर्वात मोठी मानव निर्मित आपत्ती होती आणि यामुळे शहराची वाढदेखील खुंटली.

11_Pune_Paradox
FULL STORY
पुणे शहर: एक विरोधाभास
पानशेत धरण. (छायाचित्र श्रेय : प्रथमेश कुडाळकर)

आज

पाइपचे पाणी आणि लोकांचे आरोग्य

आजकाल जोपर्यंत नळ सुरू होत नाही तोपर्यंत जलप्रवाह हे अदृश्य असतात किंवा दुर्लक्षिले जातात. नळ आणि मोटार पारंपारिक स्त्रोतांमधून‌‌ पाणी वाहून नेतात. वाढत्या शहरीकरणामुळे फक्त धरणं पाणीपुरवठ्यासाठी पुरेशी नाहीत. यामुळे भूजलावर अवलंबून राहून पाणी वितरणासाठी टँकरचा वापर वाढला आहे. कोविड-19 विलीगिकरानामुळे हालचालींवर मर्यादा आल्या आणि पाण्याच्या स्पष्ट असमान वितरणामुळे लोकांना पाणी मिळवणे आणि शारीरिक अंतर पाळणे यापैकी एक निवडणे भाग पडले.

झपाट्याने विकसित होणाऱ्या पुण्यात अद्याप पाण्याचे टँकर्स. (छायाचित्र श्रेय : छवि माथुर)
पाताळेश्वर गुहेतील विहिरींचे पाणी आता सिमेंट च्या छ्तांनी आणि धातूंच्या जाळ्यांनी वेढले आहे. (छायाचित्र श्रेय : छवि माथुर)

व्हा थोडे शहाणे
हात धुवा, चांगले आहे जंतुनाशक वापरणे
पाणी नसलेले नळ, कोरड्या विहिरी,
सगळ्यांनी पळून जाणे

References

  • Marathe, M. 2019. Reimagining water infrastructure in its cultural specificity. Case of Pune. Technical University Darmstadt. urn:nbn:de:tuda-tuprints-92810

  • Adams-Wylie, Charles Henry Benjamin, 1871 or , Compiler., and Stewart, F. B., , D.1919, Photographer. Poona Plague Pictures, 1897-1908 (1897). Web.

  • Pati, B. and Harrison M. 2018. Society, Medicine and Politics in Colonial India. 1st ed. SA. Routledge India. ISBN 9780367735258.

  • Deepak K. 2017. Disease and medicine in India: A historical overview. Tulika Books ,India .

  • Kantak, M.R. 1991. Urbanization of Pune: how its ground was prepared. Bulletin of the Deccan College Research Institute. 51/52, 489–495. jstor.org

  • Annu. Rev. Med. 1982. The Rockefeller Foundation virus program: 1951-1971 with update to 1981. 33:1-30.

  • Sutradhara’s tales – column in Hindustan times-Pune News by Saili Palande-Datar

  • Internet archive. (www.archive.org -detailed references in Resources section)

  • British Library (www.bl.uk accessed Oct 2021)

  • Digital collections at the National Librabry of Medicine (https://collections.nlm.nih.gov/ – detailed references in Resources section; accessed Oct 2021)