पुणे आणि पुण्याच्या परिसरातून पाणी पाऊस, नद्या, नाले, कालवे आणि भूगर्भातील प्रवाह यांच्या रूपाने वाहते. एका खेडेगावापासून पुणे महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या शहरांपैकी एक म्हणून विकसित होत असताना, पिण्यासाठी, धुण्यासाठी, शेतीसाठी आणि इतर बऱ्याच कारणांसाठी पाण्याचा वापर केला गेला आहे. आपल्या मूर्त आणि अमूर्त वारशांमधून संरक्षक, राज्यकर्ते, सरकारे आणि तंत्रज्ञान यांनी अनेकदा या जलप्रवाहात, त्यांच्या स्वातंत्र्यात व मार्गांत परिवर्तन घडवले आहे.